Onion Price| काही दिवसांपूर्वी देशात टोमॅटोने उच्चांक गाठला होता त्यामुळे शेतकरी सुखावला. मात्र, सामन्यांच्या खिशाला परवडत नसल्याने काहींना तर टोमॅटो बघायलाही मिळाले नाही. दरम्यान, आता कांदा सर्वांनाच रडवण्याच्या तयारीत आहे. अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढत आहे. महाराष्ट्र , दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये कांदा ८० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी जो कांदा ३० ते ३५ रुपये किलो विकला जात होता. तिथे तोच आता ७५ ते ८० रुपये किलो विकला जातोय.
यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावर्षी कमी पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच, सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. अशातच केंद्र सरकारने पुढाकार घेत,एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली कांद्याची मागणी कमी करण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार आहे. तसेच, विविध राज्यांमध्ये हा बफर स्कॉट आणला जाणार असल्याची माहिती आहे.
Crime News | प्रेमीयुगुलांनी एकत्रच संपवलं जीवन! वाघोलीत लॉजवर घडली धक्कादायक घटना
ह्या शहरांत बफर स्टॉक विकणार…
ऐन दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबर इतर भाजीपाल्यालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत. सोबतच इतर भाज्यांचे भावही पुन्हा वाढले आहेत. सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधून जवळपास १६ शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू करणार आहे.
किती किंमत?
किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा ८० रुपये किलो आहे. जो गेल्या आठवड्यात ६० रुपये तर दोन आठवड्यांपूर्वी ३० रुपये होता. चंदीगढ, कानपूर व कोलकाता ह्या शहरांमध्ये कांद्याचे दर सारखेच आहेत. आणि ते आणखी वाढू शकतात.
निर्यात शुल्क
कांद्याची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २८ ऑक्टोबर रोजी किमान निर्यात शुल्क ८०० डॉलर इतके निश्चित केले आहे. ह्या लादलेल्या शुल्कामुळे सर्वोच्च किंमतीतून ५ ते ९ टक्क्यांनी घट झाली असल्याचे सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या घाऊक भावात ४.५ टक्क्यांची घट झाली आहे.
Nashik | खा. गोडसेंची नौटंकी उघड; लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा दिलाच नाही
पुरवठ्यावर परिणाम
जून ते सप्टेंबर ह्या कालावधीत झालेल्या कमकुवत पावसाने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रमुख कांदा पुरवठादार राज्यांच्या खरीप हंगामाच्या कांदा पिकाचं नुकसान केलं. त्यामुळे कांद्याच्या काढणीलाही उशीर झाला आहे. त्यात हिवाळी पिकांचा साठाही जवळपास संपत आला असून, त्यामुळेच कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम