Amit Thackeray | ठाकरेंसमोर ठाकरेंचे आव्हान..; आदित्य ठाकरेंच्या विरोधात अमित ठाकरे मैदानात..?

0
18
Amit Thackeray
Amit Thackeray

Amit Thackeray : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरेंनी आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मनसेने विधानसभा निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून, राज ठाकरेंनी मनसैनिकांना २२५ ते २५० जागांवर निवडणुकीची तयारी करावयास संगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेकडून अमित ठाकरे निवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. मात्र, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, आता अमित ठाकरे हे विधानसभेच्या रिंगणात दिसणार का..? असा प्रश्न उपस्थित केलं आजात असून, याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, आता आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ही अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष रंगणार असल्याचे दिसत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात मनसेचे संदीप देशपांडे हे संभाव्य उमेदवार असू शकतात. मात्र, या मतदार संघाची धुरा अमित ठाकरेंच्या खांद्यावर असणार असून, त्यांनी स्वतः वरळीत लक्ष घातले आहे. वरळीमध्ये ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. अमित ठाकरे हे स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसले, तरी वरळीत ते आपली ताकद वापरणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू असली, तरी आगामी काळातच हे चित्र स्पष्ट होईल.

Manoj Jarange Patil | पवार साहेबच म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे.? – गिरीश महाजन

Amit Thackeray | राज ठाकरे शब्दावर ठाम राहणार का..?

लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचारही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

..तरीही राज ठाकरेंना शपथविधीचे निमंत्रण नाही..?

मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राज ठाकरे (RajThackeray) यांना मानाचे निमंत्रण न आल्याने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाराजी बोलून दाखवली होती. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. मानसेच्या कार्यकर्त्यांनीही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. पुण्यात मुरलीधर मोहोळ, कोकण मतदारसंघात नारायण राणे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांच्या सभा झाल्या आणि हे सर्व उमेदवार निवडूनही आले.

मात्र, तरीही राज ठाकरे यांना मानाचे निमंत्रण मिळाले नाही. यामुळेच की काय नाराज राज ठाकरे यांनी पदाधिकऱ्यांच्या बैठकीत विधानसभेला २५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले. तसेच आपण कुणाकडेही जागा मागण्यासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे मनसे महायुतीचा भाग असणार की नाही आणि राज ठाकरे (RajThackeray)आपल्या शब्दावर ठाम राहणार का..? हे येणाऱ्या काळातच कळेल.

Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here