Nashik Crime | औंदाणे (ता. बागलाण) येथे एका विवाहित महिलेने पहिल्या पतीशी कायदेशीर घटस्फोट झालेला नसतानाही नाशिक येथील दुसऱ्या एका तरुणाशी थाटात विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, आता या विवाहितेसह तिच्या आई- वडिलांविरोधातही पहिल्या पतीने सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी राहणार औंदाणे (ता. बागलाण) येथील प्राजक्ता कैलास निकम ह्या महिलेचा विवाह हा नाशिक येथील दीपक सुरेश पाटील यांच्याशी औंदाणे येथे गेल्या ८ मे २०२० रोजी झाला होता.
Maratha reservation | मनोज जरांगेंनी भुजबळांना नाशकातच घेरले!
पण, दीपक आणि प्राजक्ता हे नाशिक येथे संसार करत असताना प्राजक्ता ही वारंवार माहेरी सटाणा येथे जात असल्याने दीपकला तिच्यावर संशय आला. दरम्यान, याबाबत त्यांनी खात्री केली असता प्राजक्ता हीचा विवाह याआधीच सटाणा येथील एका तरूणाशी झालेला असल्याचे उघडकीस आले.
या दोघांमध्ये कोणतेही कायदेशीर घटस्फोट झालेला नसल्याची बाब समोर आल्याने दिपकने त्याच्या फसवणूक करणाऱ्या पत्नी प्राजक्ता आणि तिच्या आई-वडिलांवर म्हणजेच कैलास निकम आणि लता निकम यांच्याविरोधात सटाणा पोलिसांत फिर्याद दिलेली आहे.
याप्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हे या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत.
Nashik News | नाशिक जिल्ह्यात १९ जानेवारीपर्यंत जमावबंदी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम