Akshaya Tritiya | उद्या साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सण आहे. या दिवशी केलेली खरेदी ही अक्षय राहते असे मानले जाते. त्यामुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदीची खरेदी करतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आजपासूनच सराफ बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे.
या अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya) सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. या आठवड्यात गेल्या दोन दिवसांत सोने चांदीच्या किंमतीत वाढ झाली होती. गेल्या महिन्यातच १७ एप्रिलपासून चांदीतही लगातार वाढ सुरू होती. गेल्या दोन दिवसांतच चांदीच्या किंमतीत तब्बल २००० रुपयांची वाढ झाली. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरांत घसरण पहायला मिळाली. तर सोन्याच्याही दरांत घसरण बघायला मिळत आहे. तर, असे आहेत आजचे सोने चांदीचे भाव (Gold Silver Price Today 9 May 2024)
Akshaya Tritiya | सोन्याच्या किंमतीत घसरण
मागील आठवड्यात सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढले. तर, दोन हजारांनी खालीही आले. दरम्यान, या आठवड्यात ६ मे रोजी सोन्याच्या किंमतीत २०० रुपये, ७ मे रोजी ३३० रुपयांनी वाढले. तर, ८ मे रोजी सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६६,४०० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ७२,४२० रुपये असा आहे.(Gold Silver Price Today 9 May 2024)
Gold Silver Price 26 April 2024 | सोने-चांदी स्वस्त; असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर
असा आहे चांदीचा भाव
गेल्या महिन्यात १७ एप्रिलपासून चांदीतही लगातार दरवाढ सुरू होती. या आठवड्यात चांदी दोन हजारांनी महागली. ६ आणि ७ मे रोजी प्रत्येकी हजार रुपयांनी भाव वाढले. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर हा ८५,००० रुपये असा आहे.
Gold Silver Rate 24 April 2024 | सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण; असे आहेत आजचे दर
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,६४५ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,३५८ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६५,६४८ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५३,७३४ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४१,९१२ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ८५,००० रुपये असा आहे. (Gold Silver Price Today 9 May 2024)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम