Ajit Pawar | ‘केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव’ म्हणत अजित पवारांचा आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप

0
30
#image_title

Ajit Pawar | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे उमेदवारांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर निषणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका; विश्वासघात केल्याचा आरोप करत नेत्याचा बंड

“केसाने गळा कापायचे धंदे” – अजित पवार

यावेळी बोलताना अजित पवारांनी “सिंचन गैरव्यवहार प्रकरणाचे माझ्यावर आरोप झाले. त्यात सुमारे 70 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असा आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्यावर सारखा सारखा 70 हजार कोटी रुपयांच्या गैर व्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्रात निर्मितीपासून माझ्यावर आरोप होईपर्यंत जलसंपदा विभागाचा पगारासहित खर्च सुमारे 42,000 कोटी रुपये झाला होता आणि माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. आकडा मोठा असल्याने लोकांना विश्वास वाटू लागला होता. परंतु त्या आरोपानंतर जलसंपदा विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी एक फाईल तयार झाली. त्यांनी म्हणजेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अजित पवार यांची ओपन चौकशी करावी म्हणून फाईलवर सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव..त्यांनी सही केलेली मलाही माहित नव्हते” असे म्हणत आर. आर. पाटलांवर निशाणा साधला.

पुढे बोलत, “मला हेही माहित नव्हते, आपण पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. त्यावेळेस राज्यपाल म्हणाले, या फाईलवर मी सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री या फाईलवर सही करेल..लोकशाही आहे. निवडणूक झाली आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी सही केली, त्यांनी मला घरी बोलावले म्हणाले, हे पहा ही सही मुख्यमंत्र्यांकरिता राहिली होती. तुमच्या आबांनी चौकशी उघड करण्याकरिता सही केली व खरच तिथे सही होती.” असे देखील त्यांनी म्हटले.

NCP Ajit Pawar | पुण्यातील वडगाव शेरीच्या जागेचा तिढा सुटला; राष्ट्रवादी अजिद पवार पक्षाच्या सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर

“त्यांनी जे आरोप केले ते पाहून कुटुंब म्हणून वाईट वाटले”- आर. आर. पाटील

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर आर. आर. पाटील यांनी माधयमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून, “आबा प्रामाणिकपणे काम करत होते. महाराष्ट्रात गृहमंत्री असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्री पद ससांभाळलं. आज आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली असून आज त्यांच्यावर आरोप झालेले पाहून अतिशय दुःख झाले. अजित पवार जेष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले ते पाहून कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी याला उत्तर दिले असते. आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना मोठ्या मोठ्या ऑफर असताना ही डान्सबार बंदी वरती ते ठाम राहिले होते. महाराष्ट्रातील विचारांचा संरक्षण झालं पाहिजे. हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल.” असे त्यांनी म्हणत या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here