Malegaon | मंत्री भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगावात उभारणार क्रीडा संकुल

0
43

Malegaon |  मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकाच जागेवर कृषी विज्ञान संकुलात पाच महाविद्यालये ही ६५० एकरावर साकारण्यात येणार आहेत. मंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या ह्या कृषी महाविद्यालयात क्रीडा संकुलही उभारण्यात यावे यासाठी मंत्री भुसे हे आग्रही होते.

यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोड, मंत्री दादाजी भुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टीळे, उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सुनील हांजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, डॉ. सुहास दिवसे क्रीडा विभाग आयुक्त, आदी उपस्थित होते. या बैठकीत क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी क्रीडा मंत्र्यांनी २५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली.

काष्टी येथील संभाव्य क्रीडा संकुलात प्रेक्षक गॅलरी, वाणिज्यीक प्रयोजनासाठी दुकांनांचे बांधकाम, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी, व्हॉलिबॉल या सर्व खेळांची मैदाने, ४०० मौ. सिथेटोक धाव मार्ग, क्रीडा साहीत्य इ. सुविधांचा समावेश असणार आहे. ह्या क्रीडा संकुलामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच तालुक्यातील खेळाडूंना याचा मोठा फायदा होणार आहे.

Satana | आमदार दिलीप बोरसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे कृषी तंत्र विद्यालय (पॉलिटेक्निक), कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, हे पाच अभ्यासक्रम असलेले कृषी महाविद्यालय उभारले असून, याचे काम प्रगतीपथावर आहे. मंत्री दादाजी भुसे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. अभ्यासक्रमासोबतच तरुण सदृढ बनणे हे गरजेचे असल्याचेही  मंत्री भुसे यांनी सांगितले.

पाच महाविद्यालये सुरु

मालेगाव येथील काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मिती तसेच कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या विद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यास २६ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली होती. २०२०-२१ पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, तर, २०२१-२२ पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय हे सुरु झाले आहेत. तर उर्वरित तीन महाविद्यालये ही या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आले आहेत.

एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी

ह्या कृषी विज्ञान संकुला अंतर्गत कृषी शिक्षणासोबतच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन व निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम हे विकसित करण्याचेही नियोजन आहे.

या संकुलामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहे. कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी यामुळे शक्य होणार आहे.

Big News | सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here