Shirdi : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये श्री साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी दररोजच शेकडो लोक साई चरणी नतमस्तक होत असतात. दररोजच लाखो रुपयांचे दान भाविक भक्तांकडून केलं जातं. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदक्षिणा म्हणून आंध्र प्रदेशातील साईभक्त असलेल्या वामसी कृष्णा विटला यांनी साईबाबा चरणी 355 ग्रॅम वजनाचा जवळपास 20 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या शिर्डी येथील साईबाबा देवस्थान देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. याआधी देखील अनेक भाविक भक्तांकडून साईबाबां चरणी कोट्यावधी रुपयांचे दाग दागिने आणि देणगी अर्पण करण्यात आली आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या आंध्र प्रदेश येथील साईभक्त वामसी कृष्णा विटला यांनी मुकुट अर्पण करत साईबाबांना ही अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे.
दरम्यान दुपारच्या आरतीच्या वेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थान कडे त्यांनी सुपूर्द केला वामसी कृष्णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छे खातर हा मुकुट साईबाबांच्या मूर्तीला परिधान देखील करणारा होता. श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते यावेळी वामसी कृष्णा आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार देखील करण्यात आला.
वामसी कृष्णा हे बालपणापासून साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. सध्या ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले असून आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत त्यांनी आपली व आपल्या कुटुंबियांची इच्छा असल्याने साईबाबांना हा मुकुट अर्पण केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम