Weather update | हिवाळा नाही पावसाळा; वादळ वाऱ्यासह तूफान पावसाची शक्यता

0
19

Weather update | राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी हवेत गारवा व दिवसा उकाडा अशा वातावरणात आता पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता ऐन भात कापणीच्या मोसमात पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी

गेल्या  काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जास्त वाढली होती. मंगळवार पासून काही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण  होते. बुधवारी रात्रीदेखील पावसाच्या हलक्या सरींनी अनेक ठिकाणी हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासून सर्वत्र थंडीचा जोर वाढलेला दिसून आला. राज्यभरात अनेक भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. यामुळे अचानक वातावरणात गारवा वाढला आहे. ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या सरी व थंड वारा याचा परिणाम पिकांवर होत आहे.

Nashik News | सिविल हॉस्पिटलचा अजब कारभार; जिवंत महिलेस केलं मृत घोषित

द्राक्ष बागांना धोका

ऐन दिवाळीत आता हिवाळा सुरू होण्याची अपेक्षा असताना अचानक पावसाचे आगमन हे आता छाटणी झालेल्या तसेच फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना मोठा धोका ठरणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊसही झाला. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्षाचे घड कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत आहेत. दरम्यान, यामध्ये आता पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

 तुफान पाऊस

बदलत्या वातावरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे. यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्येच अडकून पडणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. आजही वातावरण ढगाळ असल्याने पावसाची शक्यता आहे पण, अचानक पडलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत.

Maratha Reservation | नाशिक जिल्ह्यात सापडल्या आठ हजार मराठा-कुणबी नोंदी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here