शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे संकट अडकले आहेत. यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महिलेने केलेला आरोप राहुल शेवाळे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत. शेवाळे यांनी म्हटले आहे की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटा आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतू आहे. मी निर्दोष आहे. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. त्याचप्रमाणे माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पदार्फाश करेल. असंही शेवाळे यांनी स्पष्ट केलं.
माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णत: विश्वास आहे. याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. नाव खराब करण्यासाठी हे आरोप केले आहे. पर्दाफाश लवकरच करेन, असेही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम