द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 18 लाखांचा चुना लावणाऱ्या तुषार दवंगेला दोन वर्ष कारावास

0
16

चांदवड : चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या कडून पाच वर्षांपूर्वी द्राक्षमाल घेत फसवणूक केलेल्या खेडगाव येथील व्यापारी तुषार भास्करराव दवंगे यास सुमारे 17 लाख 91 हजार 400 रु पयाच्या फसवणूक केल्याप्रकरणी चांदवड न्यायालयाचे प्रथम न्यायाधिश एन.ए. इंगळे यांनी फसवणूक करणा -या दवंगे यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे यामुळे फसवणूक करून तुरी देणा -या व्यापा -यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

तर न्यायधिश इंगळे यांनी दिलेल्या निकालाचे सर्व शेतक:यांकडून स्वागत होत आहे.चांदवडचे प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी दि.  28 मार्च रोजी सदर निकाल दिला.

चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील शेतकरी बाळासाहेब देवराम कोठुळे यांनी 2017 साली वणी येथील तुषार दवंगे याच्या तुषार व्हेजिटेबल कंपनीला 4350 प्रती क्विंटल या दराप्रमाणो द्राक्ष विकले होते. त्या बदल्यात त्यांनी पिंपळगाव येथील एच.डी.एफ.सी बँकेचे तीन धनादेश कोठूळे यांना सुपूर्द केले. दिलेल्या तारखेस द्राक्ष उत्पादक बाळासाहेब कोठुळे यांनी ते बँकेत जमा केले असता ते वठले नाही.काही दिवस तगादा केल्यानंतर कोठुळे यांनी न्याय प्रक्रि येद्वारे जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे पाच वर्षांनंतर सदर शेतकऱ्याला न्याय मिळाला असून आरोपी दवंगे यास चांदवड न्यायालयाने कारावास सुनावल्यानंतर इतरही फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकऱ्यांच्या वतीने अॅड.पी.पी पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली.

निकाल देताना न्यायालयाने पहिल्याच ओळीत बॉल बाऊन्स केल्यास तो खेळ समजला जातो पण चेक बाऊन्स केल्यास तो गुन्हा असल्याचे कडक ताशेरे ओढले आहेत.आरोपी दवंगे यास चेक बाऊन्स प्रकरणी झालेली सहा महिन्यांची शिक्षा टाळायची असेल तर त्यास सिक्युरिटी बाँड सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.आतापर्यंत फसवणूक झालेल्या शेतक -यांसाठी हा निकाल महत्वाचा मानला जात असून यामुळे मोठी जरब व्यापाऱ्यांना बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

कोण आहे तुषार दवंगे ?
खेडगाव ता. दिंडोरी येथील रहिवासी असलेल्या तुषार दवंगे याचा वावर राजकीय, सरकारी दरबारात सतत असल्याचे बोलले जाते. राजकीय नेते, बडे अधिकारी यांच्यात वावर असल्याचे भासवून त्याने अत्यल्प शेती असताना त्याचा खेडगाव येथील कोट्यावधींचा आलिशान बंगला या सर्व गोष्टींची पाहता क्षणी साक्ष देतो. एकूणच दिलेल्या तीन निकालांद्वारे झालेली फसवणूक मोठी असून अद्याप अजूनही कुठे शेतक:यांची फसवणूक झाली आहे का याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चार वर्षे सात महिन्यांनी लागलेल्या या निकालामुळे उत्पादक शेतक:याला न्याय मिळाला असला तरी आरोपी दवंगे याने वरिष्ठ न्यायालयात धाव घेतल्याची चर्चा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here