खालपचे युवा उदयोजक कैलास देवरे यांची आत्माकडून पुरस्कारासाठी निवड ; १ मे रोजी वितरण

0
16

देवळा ; खालप ता देवळा येथील युवा उद्योजक शेतकरी कैलास आनंदा देवरे यांची कृषी उल्लेखनीय कामाबद्दल शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . हा पुरस्कार वितरण सोहळा दि १ मे रोजी नाशिक येथे पार पडणार आहे .

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकरी , शेतकरी गट यांचा गौरव करण्यात येतो . यात खालप ता देवळा येथील युवा उदयोजक शेतकरी कैलास देवरे यांची कृषी उल्लेखनीय कामा बद्दल आत्मा नाशिक मार्फत सण २०२१/२२ साठी आदर्श शेतकरी पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे .

हा पुरस्कार वितरण सोहळा १ मे रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,दिंडोरी रॉड ,नाशिक येथे सकाळी ११ वाजता मंत्री महोदय , कृषी व माजी सैनिक कल्याण यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे . अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी दिली . युवा उदयोजक कैलास देवरे यांचा कृषी पूरक सेंद्रिय गूळ उद्पादक व्यवसाय असून ,अल्पवधीत या व्यवसायांत त्यांनी चांगली प्रगती केली असून ,त्यांच्या गुळाला जिल्ह्या बाहेरून मागणी वाढली आहे . सचोटी व सातत्यपूर्ण कामामुळे शासनाच्या कृषी विभागाने याची दखल घेतली आहे .

देवरे यांचा याआधी विविध संस्थांकडून उत्कृष्ट कामकाजा बद्दल गौरव करण्यात आला असून , आता शासनाकडून त्यांची उल्लेख निय कामकाजाबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने देवरे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे ,


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here