हंगामातील कापूस उत्पादनात मोठी कमाई , कृषी विभागाची माहिती

0
21

यावर्षी अनेक वेळा अवकाळी पावसामुळे शेतीमालाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळी आणि प्रतिकूल हवामानामुळे कापूस उत्पादनात घट झाली. कापसाच्या दराने बाजी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा कापूस लागवडीवर अधिक भर देणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिनिंग, सूतगिरण्या आणि कापड उद्योगाच्या मते देशात यंदा ३०० लाख गाठींचेच उत्पादन आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज त्यांना मान्य नाही. उत्पादनात मोठी घट आल्याने बाजारातील कापूस आवक कमी राहीली. त्यामुळे दरात हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेजी असेल. केंद्र सरकारने नुकतेच कापूस आयातशुल्कात कपात केली असली तरी कापसाच्या दरावर त्याचा परिणाम झाला नाही.

शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतरही अनेक शेतकरी त्याच्या लागवडीकडे वळले आहेत. आता तो प्रचंड नफा कमावत आहे. कापूस दर वाढल्यामुळे कापड उद्योग सतत कापसावरील आयातशुल्क कपातीची मागणी करत होता. आयातशुल्क कमी केल्यास कापूस दर कमी राहतील असा कापड उद्योगाचा अंदाज होता. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे कापसातील तेजी कायम राहिल, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here