नाशिक: मागील नऊ वर्षांपासून टाळेबंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory ) भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबत झालेल्या निर्णयाला कार्यक्षेत्रातील सर्वच घटकांनी सहमती दर्शवली असून सभासदांनी ऊस लागवडीला प्राधान्य देत कामगारांनीही कंपनीच्या मागणीनुसार वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन नाशिक साखर कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे आणि इतरांनी केले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी अरुण कदम यांनी कारखाना सुरू करण्यासाठी घेतलेली भूमिका, दिपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांनी यासाठी दिलेला प्रतिसाद, खासदार हेमंत गोडसे यांनी केलेले प्रयत्न आणि आमदार सरोज अहिरे यांनी केलेला पाठपुरावा यामुळेच आता शेतकरी, कामगार, परिसरातील छोटे मोठे व्यवसायिक यांच्या जीवनात पुन्हा आनंदाचे दिवस सुरू होत आहे.
एप्रिलच्या सुरूवातीनंतर कारखान्याचा गेट उघडल्यानंतर तीन तारखेपासून युद्धपातळीवर कारखाना दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता कारखान्याच्या विविध घटकांसाठी कंपनी प्रशासनास मदत करण्याचे आवाहन कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. कारखान्यास आवश्यक असलेला ऊस पुरवठा करण्याची जबाबदारी ऊस उत्पादन शेतकऱ्यांची आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम