दिंडोरीतील श्री क्षेत्र करंजी येथे शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा

0
152

वैभव पगार

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (दिंडोरी) : दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे शुक्रवारी (दि. 8 एप्रिल) स्व. श्री. लिलारामजी सगतारामजी जांगीड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रह्मलीन प. पु. महंत सुभाषगिरीजी महाराज यांच्या समाधीस्थळावरील छत्री व मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे.

जांगीड परिवारातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 8 वाजता पुजन व हवणाने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर यादरम्यान शनिवारी (दि. 9 एप्रिल) पल्लवी पटवर्धन व टीमचा भजन संध्या कार्यक्रम पार पडणार आहे.

रविवारी (दि. 10 एप्रिल) या सोहळ्याची सांगता होणार असून, या दिवशी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here