उमराने बाजार समितीत कांदा आवक घटली ; भाव तडकण्याची चिन्हे

0
66

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या हप्त्याच्या तुलनेत लाल कांदा आवक घटली असून साधारणतः पुढील एक महिनाभर कांद्याची आवक वाढणार नसल्याचे चित्र आहे. सद्या बाजारभाव स्थिर आहेत. मात्र मागणी वाढल्यास बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

रोख पेमेंट, चांगला बाजारभाव, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांची जास्तीची संख्या, इलेक्ट्रॉनिक भुईकाटे आदी कारणांमुळे कांदा आवक नेहमीच चांगली असते, बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांची आवक काही अंशी घटली असून बाजारभाव मात्र स्थिर आहेत.

लाल कांदा ५०१ रुपये, जास्तीत जास्त २५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये दर मिळाला आहे. दरम्यान, नवीन लागवड केलेला उन्हाळी कांदा बाजारात येण्यास दीड ते दोन महिने अवधी असून सद्य:स्थितीत लाल कांदाही ठरावीक शेतकऱ्यांजवळच शिल्लक असल्याने येत्या महिनाभर कांद्याची आवक कमीच राहणार असल्याचे चित्र आहे. परिणामी देशांतर्गत मागणी वाढल्यास बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here