द पॉईंट नाऊ ब्युरो : बळीराजाला सुगीचे दिवस नक्की कधी येणार हे काही सांगता येत नाहीये. मागील वर्षभरात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा आता अजून समोर आला आहे.
कोरोना, अवकाळी पाऊस, यामुळे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झालेला दिसला. यामुळे जवळपास तीन हजारांच्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
डोक्यावर कर्ज घेऊन शेतात पीक घेतले. मात्र अस्मानी – सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांना पूर्णतः निष्प्रभ केले. हाता तोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेला. यामुळे शेतकरी वर्गाचा आत्महत्या करण्याचा आकडा काही केल्या कमी झालेला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम