कांदा उत्पादकांनी , रासायनिक खते घेताना पक्के बिल घ्यावेत

0
66

कृषी प्रतिनिधी : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात यावर्षी रब्बी कांद्याची विक्रमी लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा लागवड जवळपास संपत आलीआहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांना या वर्षी दीड-दोन पट अधिक खर्च करावा लागला , येथुन पुढे काही दिवस नैसर्गिक आपत्तीवर मात करत त्याचे संगोपन करून, अधिक चांगले उत्पादन यावे या दृष्टीने उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रयत्न चालू आहेत. लागवड व तदनंतर प्रमुख भाग म्हणजे रासायनिक खते, तणनाशक,व इतर औषधे यांचा रास्त दरात मुबलक प्रमाणात तोही किफायतशीर दरात पुरवठा होणे आवश्यक आहे.

परंतु वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत काही खत उत्पादक कंपन्यां व दुकानदार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे शेतकर्यांची अडवणूक व पिळवणूक करत, आर्थिक लुटमार करत आहेत. बाजारात खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने विक्री तसेच अनावश्यक प्रॉडक्ट शेतकर्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कृषी मंत्री दादा भुसे व जिल्हा क्रुषि अधिकाऱ्यां कडे तक्रार दाखल केली आहे , त्याबाबतचे आदेश मंत्री महोदयांनी कृषी खात्याला दिलेले आहेत. सर्व कांदा उत्पादक शेतकर्यांना आवाहन करण्यात येत आहे की,अशा प्रकारे जर कोणताही दुकानदार कंपनीचे नाव पुढे करून आपली अडवणूक करत असेल तर संबंधित तालुका क्रुषी अधिकारी अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांशी तातडीने संपर्क साधून तक्रार दाखल करावी.

असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव , जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाने, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट , कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पवार , जिल्हा समन्वयक भगवान जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे , महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे…..!

यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृपया तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केलं आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here