शरद पवारांचा मेट्रो प्रवास ; चंद्रकांत पाटलांची टीका

0
13

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

शरद पवार यांनी या प्रवासादरम्यान मेट्रोच्या कामाची माहिती देखील घेतली. शरद पवार यांच्या या अचानक दिलेल्या भेटीबाबत कोणालाही कल्पना नव्हती.

शरद पवार यांच्या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र टीका केली आहे. स्थानिक आमदार, खासदार यांना न कळवता अशा प्रकारे मेट्रोची ट्रायल घेण्याचे कारण काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मेट्रोला 8 हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिला आहे. कोविडमुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारे मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलले होते. पवारांनी अशा प्रकारे घाईघाईत एकट्याने मेट्रोची ट्रायल घेण्याचे कारण काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सर्व आमदारांना मेट्रो विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले.

आधी सत्ता असतांना तुम्ही हा प्रकल्प का केला नाही? हे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पिंपरीतील मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पास शरद पवार यांनी अचानक भेट देत प्रवासही केला आणि कामाबाबत त्यांनी माहितीही घेतली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here