निफाड प्रतिनिधी : तालुक्यातील कोठुरेगावी कोरोना काळात आपल्या कर्तव्य तत्पर सेवा बजविणाऱ्या कोरोना योद्धाचा सन्मान करत ७५वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कोठुरे ग्रामपंचायत कार्यालयात निफाड शेतकरी संघाचे चेअरमन राजेंद्र डोखळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत कोठुरे ग्रामपंचायतिच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.कोठुरे ग्रामपंचायतचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉक्टर व परिचारिका, तलाठी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका या सर्वांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा फेटा बांधून व महिलांना साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच जयश्री प्रकाश मोगल, उपसरपंच संगीता सताळे, सदस्य मच्छिंद्र कोकाटे, नवनाथ मोगल,सुयोग गीते,बाळू बेंडकुळे,सुनील सातभाई, विनायक गायकवाड,सरला उत्तम बुटे,ज्योती पवार,भारती मोगल,मालती मोगल, उज्वला कोकाटे ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉक्टर दिलीप बोदडे,डॉ. पूजा कापसे, नीलम पाटील,अर्चना मोरे, माधुरी बर्वे, वैशाली मुळे, मुक्ता कडलग, कल्पना कहाळे प्रविना शिंदे, मनीषा मोगल यांनी कोठुरे गावासाठी मोलाचे काम केले. गावात वाड्या वस्त्यांवर जाऊन बाहेरून आलेल्या व नागरिकांची नोंद डॉक्टर व ग्रामपंचायतीस कळविने व रुग्णाना मार्गदर्शन करणे अशा विविध कार्याबद्दल सन्मान कोठुरे ग्रामपंचायतिच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करत, सामाजिक अंतर पाळून, तोंडाला मास्क बांधून सर्वत्र खबरदारी घेत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कोठुरे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा कोठुरे फाटा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कोठुरे, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय कोठुरे, बाणेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठुरे, कोठुरे विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठुरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, येथे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हस्ते झेंडावंदन मोठया उत्साहात पार पडले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम