द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील कृषिमंत्री दादा भुसे यांच्याच मतदारसंघातच अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2020 यामध्ये अतिवृष्टीने शेतकरी वर्गाचे पूर्णतः कंबरडे मोडले. एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र हे अनुदान गरजू शेतकरी वर्गाऐवजी बोगस लाभार्थ्यांच्या घशात गेल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य शासनाद्वारे सुमारे 87 कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेच नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले आणि पुराव्यानिशी प्रशासनाकडे पोहोचले. यामुळे हा गैर प्रकार समोर आला आहे.
आता यावर पुढे काय कारवाइ होते? याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम