सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना कर्मचाऱ्यांनी ग्राहक समजून सेवा द्यावी. स्वस्त धान्य दुकानदारांनी मर्यादित दिवस धान्य वाटप न करता जास्तीत जास्त दिवस धान्य वाटप करून कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच दुकानाच्या दर्शनी भागात धान्याचे नमुने ठेवावेत अशी सुचना तहसिलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या बैठकीत केली. यावेळी ग्राहक दिनास अनुपस्थित असलेल्या शासकीय विभागांचा देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्यावतीने निषेध करण्यात आला. जागतिक वनदिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
फसवणुक झालेल्या ग्राहकांना तक्रार देण्यासाठी संपर्क साधणे सुलभ होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. येथील नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात दि. १५ मार्च रोजी तहकुब करण्यात आलेला जागतिक ग्राहक दिन तहसिलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली २१ मार्च रोजी साजरा करण्यात आला.यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरेे, सचिव संजय भदाणे, बंडू जोशी, बाबा पवार, राजपाल आहीरे, शशिकांत चितळे, सचिन आहेर, चंद्रकांत भदाणे, मोबीन तांबोळी आदि ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. संजय देवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्राहक पंचायतीचे महत्व विषद केले. ग्राहकाने फसवणुक झाल्यानंतर तक्रार केल्यावर संबंधित विभागाकडून वेळेवर कारवाई होत नसल्यामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाहीत हि बाब निदर्शनास आणून दिली तसेच विविध विभागांकडून ग्राहकांना येणाऱ्या समस्या मांडल्या.
Deola | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकित कर्ज वसुली संदर्भात देवळा येथे संयुक्त आढावा बैठक
सध्या ऑनलाईन फसवणुक होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यासाठी कोणतीही कार्यक्षम यंत्रणा नसल्यामुळे अनेक ग्राहक नाडले गेले आहेत. यासाठी तालुक्यात सक्षम यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली. बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी स्वप्निल भामरे यांनी कोणत्याही ऑनलाईन स्कीमला बळी न पडता प्रत्यक्ष बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी सिताराम पाखरे यांनी सर्व योजना ह्या ऑनलाईन असल्यामुळे त्यात पारदर्शकता असून त्यात बाहेरून कोणालाही हस्तक्षेप करता येत नसल्याची ग्वाही दिली. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मार्केटींग, दिशाभूल करणाऱ्या जाहीराती यामुळे ग्राहकांची फसवणुक होण्याच्या घटना वाढत असून ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहीती नसल्याने फसवणुक झाल्यावर काय करावे?. याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. तसेच ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षर करण्यात ग्राहक पंचायत मोलाची भुमिका बजावु शकते असे प्रतिपादन केले.
यावेळी जागतिक वनदिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
बैठकीस नायब तहसिलदार बबन आहिरराव, गटविकास अधिकारी राजेश कदम, तालुका कृषी अधिकारी सिताराम पाखरे, वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष जाधव,दुय्यम निबंधक राजू शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शारदा गावंडे, महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी स्वप्निल भामरे, खर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ जितेंद्र पवार, विज वितरण कंपनीचे सुनिल कुमावत, पेट्रोल पंप चालक अशोक आहेर, आदींसह स्वस्त धान्य दुकानदार व नागरीक उपस्थित होते. देवळा शहरातील मुद्रांक विक्रेते ग्राहकांना मुद्रांक देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दुय्यम निबंधक राजू शिंदे यांनी मुद्रांक विक्रेत्यांना पत्र देऊन याबाबत कडक ताकीद देणार असून अडवणुक करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. दुय्यम निबंधक कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्यामुळे ह्या कार्यालयात येणाऱ्या अपंग, रूग्ण, वृद्धांना कार्यालयात न बोलावता तळमजल्यावरच सेवा देणार असल्याचे आश्वासन दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम