सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संस्थेच्या सावकी येथील जनता विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक नितीन सोनवणे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीमती निकम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ही “माय भूमी ही कर्मभूमी” हे तर नववीच्या विद्यार्थ्यांनी हा “देश माझा याचे भान जरा राहू द्या रे’ हे गीत सादर केले. कु अर्चना गोधडे, कु साक्षी गांगुर्डे, कु कल्याणी सोनवणे यांनी मराठी भाषेचे महत्व व कविता वाचन केले. कु संजीवनी गांगुर्डे ने भारुड सादर केले. मराठी विषयाचे शिक्षक सोनवणे यांनी मराठी भाषा किती समृद्ध आहे व तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, असे सांगितले. कार्यक्रमास श्रीमती पवार, श्रीमती देवरे, सचिन बोरसे सचिन आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना “छावा” चित्रपट दाखवण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम