सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर सहस्त्रलिंग, नांदुरेश्वर, गुंजाळनगर, देवदरेश्वर, माळवाडी, उमराणे आदी ठीकाणी महाशिवरात्री निमित्त सप्ताहभर भजन, किर्तनासह विविध कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर सहस्रलिंग देवस्थान येथे स्वर्गीय वै. गुरुवर्य वामनानंद माहाराज यांच्या प्रेरणेने व ह.भ.प. सुखानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. देवळा येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिरात गुरूवार दि. २० ते गुरूवार दि. २७ ह्या कालावधित मंदीराचा तिसरा वर्धापनदिन व महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. महाशिवरात्री निमित्त श्री शिव रामायण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. मनोजजी महाराज ऐनगावकर यांच्या प्रवचनाचा पंचक्रोशीतील महिला भाविक व शिवभक्तांनी लाभ घेतला. उत्सवाचे आयोजन शिवरामायण कथा आयोजक समिती व शिवभक्त देवळा यांच्या वतीने करण्यात आले होते. गुरूवार (दि. २०) रोजी शहरातून पालखी मिरवणुक काढण्यात येऊन महाशिवरात्र उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. मंदिरात नियमितपणे पुजा पठण, तसेच उत्सव काळात नित्यनियमाने सायंकाळी आठ ते अकरा ह्या वेळेत शिव रामायण कथेवर ह.भ.प. मनोजजी महाराज ऐनगावकर यांचे नित्यनेमाने प्रवचन झाले. यावेळी शिव रामायणातील प्रसंग आकर्षक वेशभूषा केलेल्या विविध पात्रांनी नाट्यरूपाने सादर करून कार्यक्रमाची आकर्षकता वाढवली. गुरुवारी काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
Deola | खर्डे येथील किशोर भामरे यांची महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता पदी निवड
संगमेश्वर महादेव मंदिर हे तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. ह्या मंदिराची उभारणी ५० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भावडी व कोलती नदीच्या संगमावर खोदकाम सुरू असताना महादेवाची पुरातन पिंड सापडली होती. गावातील भाविकांनी ह्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा संकल्प केला व ह्या ठिकाणी लोकवर्गणीतून छोटे मंदीर बांधण्यात आले. कालांतराने ह्या पुरातन मंदीराचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकवर्गणीतून मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यात येऊन तीन वर्षापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुले करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम