सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले रामेश्वर येथील डॉ. दौलतराव आहेर उद्यानाला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आगीच्या ज्वालांनी उद्यानाचा काही भाग व्यापला होता. दरम्यान देवळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने पुढील मोठी हाणी टळली. मात्र, उद्यानातील असंख्य लहान झाड व ड्रीप संच या आगीत जळून खाक झाली. रामेश्वर गावचे उपसरपंच रघु पगारे हे राहत्या घरापासून दुसऱ्या मळ्यात जात असतांना उद्यानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत रामेश्वरच्या ग्रामसेविका वैशाली हेळीज यांच्या माध्यमातून देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन कर्मचारी समाधान वाघ, दीपक सूर्यवंशी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Deola | देवळा येथे चोरीच्या घटनांत वाढ; भरदिवसा महिलेच्या पिशवीतून रोख रक्कम लंपास
रामेश्वरचे माजी उपसरपंच तथा मविप्र संचालक विजय पगार, भाजप माजी युवा अध्यक्ष किशोर आहेर, उपसरपंच रघु पगार, अशोक खैरनार, योगेश आहिरराव, शुभम आहिरराव, यशवंत आहिरराव, शैलेश पगार, उत्कर्ष पाटील यांनी मदतकार्यात सहभागी होत अवघ्या तासाभरात आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे पावसाळ्यात नवीन लागवड केलेली तसेच लहान असलेली बहुसंख्य रोप होरपळून निघाली. झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीप द्वारे सिंचन व्यवस्था करण्यात आली होती. त्या ड्रीपच्या नळ्या, पी.व्ही.सी. पाईप देखील आगीत जळून खाक झाले. विजय पगार यांनी ग्रामपंचायतीला त्वरित नवीन ड्रीप, पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम