सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील एसीबीआयच्या शाखेतून सेवानिवृत्त शिक्षिकाच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. देवळा येथे पंधरा दिवसांपूर्वीच बाजार समितीच्या आवारात उभ्या कारमधून पैसे लंपास करण्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी (दि. २०) रोजी बँकेतून वृद्ध महिलेच्या पिशवीतून पैसे चोरीस गेल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी अशा चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. राजेंद्र गुंजाळ यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुंजाळनगर, (ता. देवळा) येथील सेवानिवृत्त शिक्षिका जयश्री पुंजाराम गुंजाळ (वय 75) ह्या गुरुवारी (दि.20) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास देवळा येथील एसबीआय शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते.
Deola | सार्वजनिक बांधकाम खाते निरधास्त; विठेवाडी ग्रामपंचायतीने बुजवले खड्डे, चाऱ्या
त्यांनी बँकेतुन 55,000/- हजार रुपये पैसे काढुन त्यांनी आपल्या जवळील चैन असलेल्या कापडी पिशवीत ठेवले. यानंतर त्यांनी आपल्या बँक खात्यावर किती पैसे शिल्लक आहेत हे बघण्यासाठी पास बुक घेवुन बँकेलगतच असलेल्या एटीएममध्ये पास बुक प्रिंन्ट करण्यासाठी गेले. पास बुक प्रिंन्ट करणे त्यांना जमत नसल्याने तेथे असलेल्या त्यांच्या गावातील मुलाला सांगुन पासबुक प्रिन्ट करायला त्याच्याकडे दिले. तेव्हा श्रीमती गुंजाळ यांनी कापडी पिशवी त्यांच्या खांद्याला अडकवुन तेथेच थांबले होते. पास बुक प्रिन्ट करुन त्या घरी गेल्यावर पिशवीतुन पैसे व पास बुक काढून कपाटात ठेवण्यासाठी पिशवी बघितली असता पिशवीत फक्त 5000/- रुपये आढळून आले.
पिशवी पुर्ण मोकळी करुन बघितली. परंतु त्यात पैसे अढळुन आले नाही. याची त्यांनी बँकेत जावुन चौकशी केली. मात्र पैसे मिळून आले नाही. या घटनेची जयश्री गुंजाळ यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याची कसून चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षिका गुंजाळ यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गुंजाळ यांनी केली आहे. सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे गुंजाळ यांनी सांगितले असून, बँकेने देखील एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. देवळा शहरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, पोलसांनी देखील सतर्क राहून, चोरट्यांना आवर घालावा. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम