सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील मटाणे ते विठेवाडी दरम्यान असलेल्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाइप लाइन व पावसामुळे चाऱ्या आणि खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असा संभ्रम वाहनधारकांना पडला असून, सदर रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर जागोजागी एक एक फुटाचे खड्डे पडले आहेत.
Deola | दौलत गुरुकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व पंचायत समिती, जिल्हा परीषद इ व द विभाग देवळा यांना दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले तरी दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली नाही. याची नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी विठेवाडी ग्रामपंचायतीला सदर खड्डे बुजविण्यासाठी गळ घातली असता शिवजयंती निमित्त एकत्र आलेल्या सदस्यांनी स्वतः लक्ष घालून जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यांमध्ये मुरुम टाकुन घेतला आहे. याचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम