Deola | दौलत गुरुकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

0
3
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | डॉ. डी. एस आहेर इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल विठेवाडी (लोहोणेर) येथील दौलत गुरुकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात शिवजयंती साजरी करत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्छाव होते. प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, प्राचार्य बी.के. पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सेजल पाठक, तन्मय हिरे, रोहन पाठक, अर्जुन परदेशी, आर्यन पाठक, समीर बहिरम या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, शिवाजीराजे, संभाजीराजे, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिका साकारून विविध कार्यक्रमांचा जिवंत देखावा सादर केला.

यानिमित्ताने देवळा येथील सुभाष रोड पासून ते शिवतीर्थापर्यंत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंदाचा अनुभव घेतला. निम गल्ली, राममंदिर परिसर, पेठ गल्ली आणि शिवतीर्थ येथे दौलत गुरुकुलच्या मराठमोळ्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, पावरी नृत्य, पावनखिंड नाटिका, शिव गारद, मल्लखांब, मर्दानी खेळ, लाठीकाठी असे अनेक कार्यक्रम सादर केले. या निमित्ताने देवळा येथील शिवतीर्थ मंडळाकडून विविध कलागुण सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सुभाष रोड ते शिवतीर्थपर्यंतचा परिसर विविध घोषणांमुळे दुमदुमून गेला होता.

Deola | उमराणे येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

आश्रम शाळेचे सहाय्यक शिक्षक प्रशांत पवार आणि इतर शिक्षक तसेच दौलत गुरुकुलचे प्राचार्य बी.के. पाटील, शाळेचे पर्यवेक्षक सी.जी. खैरनार, सतीश निकम, शुभांगी सावंत, समन्वयक उमेश देवरे आणि संपूर्ण शिवजन्मोत्सव कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे हर्षद बच्छाव यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमास नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, अरुणा आहेर, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, प्रमोद पाटील, डॉ. विश्राम निकम, डॉ. वसंतराव आहेर, डॉ. प्रमोद आहेर, प्रदीप आहेर, बंडू आहेर, कौतिक पवार, दिलीप मेतकर, भाऊसाहेब आहेर, आबा आढाव, योगेश वाघमारे, संतोष शिंदे, युवराज आहेर, माजी सरपंच किरण गांगुर्डे, सुनील आहेर, विष्णु शेवाळे, सोमनाथ जगताप, नितीन शेवाळकर, मोठाभाऊ पगार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रम शाळेचे शिक्षक भगवान आहेर यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here