सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथे सुतार लोहार संघटनेच्या वतीने सोमवारी दि. १० रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी श्रीराम मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच राहुल देवरे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ व समाज बांधवांच्या वतीने प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोकुळ जगताप, विकास सोसायटीचे माजी संचालक रामकृष्ण कुवर, भानुदास जगताप, मंगेश जगताप, नंदू जगताप, सोपान कुवर, हर्षद जगताप, दीपक कुवर, प्रमोद खैरनार, आबा कुवर, अनिकेत कुवर, संजय कुवर, पिंटू जगताप, साहेबराव जगताप, विकी जगताप, भावडू जगताप, गणेश जगताप, परेश जगताप आदी समाज बांधव, महिला, अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम