सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | स्वप्न पूर्ण करण्यासाठी विचार सकारात्मक असावेत. यासाठी मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असून, मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम वाचन अशा महत्वपूर्ण सवयी विद्यार्थ्यांनी जोपासाव्यात असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतरणपटू तन्वी विप्लव देवरे यांनी येथे केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. त्या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध जलतरणपटू तन्वी देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या इंग्लिश खाडी पार करण्याच्या अनुभवाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक अहवालाचे वाचन स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.जे डी कडू यांनी केले.
Deola | देवळा बाजार समितीच्या आवारात कारमधून रोकड हडपण्याचा प्रयत्न
क्रीडा अहवालाचे वाचन प्रा. किरण भामरे यांनी केले. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात भक्ती गीते, लावण्या, समूह गायन, समूह नृत्य, मुक अभिनय, पर्यावरण जागृती नाटिका अशा विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यानी मनमुराद आनंद घेतला. शैक्षणिक वर्षात विविध उपक्रमांत सहभाग घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण व गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव प्रा.डॉ. मालती आहेर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.बी. के रौदळ, उपप्राचार्य डॉ.जयवंत भदाणे, प्रा.आर.एन.निकम आदी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. डी.के.आहेर यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम