Deola | देवळा येथील राजधीर फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि.25) रोजी जि.प. च्या चार शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग व वॉटर बॉटलचे वाटप करण्यात येणार आहे. यात भावडे येथील -22, कापशी फाटा येथील -27 विद्यार्थी, हिंदळा वस्ती शाळा (वाखारी) -21, भौरी वस्ती शाळा (दहिवड) -25 अशा एकूण ९५ विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संबंधित गावातील सर्व शिक्षक, फाऊंडेशनचे सभासद, संचालक, सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम