सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अशासकिय सदस्य पदी तालुक्यातील रामेश्वर येथील संघर्ष समाज विकास मंडळाच्या वैशाली विष्णू शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशान्वये महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात येऊन नवीन सुधारित समिती गठीत करण्यात आली असून यात रामेश्वर येथील वैशाली विष्णू शेवाळे यांची अशासकिय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला तक्रार निवारण समितीतील अध्यक्ष व सदस्य यांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार समितीचे सर्व कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडावे.
Deola | कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
तसेच समितीच्या वेळोवेळी बैठका आयोजित करुन त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याची कार्यवाही करावी. वरील अधिकारी व कर्मचारी यांनी महिला तक्रार निवारण कक्षमार्फत महिला कर्मचाऱ्यांच्या प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावयाची आहे. तसेच महिला तक्रार कक्ष संबंधीच्या कामकाजाचा आढावा घेऊन दरमहा प्राप्त तक्रारी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर करावा व अहवालाची एक प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांना पाठवावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम