सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विखाऱ्या डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाणी घेण्यात आलेल्या भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबीर नुकतेच संपन्न झाले. स्काऊट गाईड विभागाच्या वतीने याठिकाणी तीन दिवसीय निसर्ग निवास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी स्काऊट गाईड गणवेशात शिबिराच्या ठिकाणी सकाळी पोहोचून स्काऊट गाईड विभागाच्या वतीने तयार केलेल्या संघाप्रमाणे तंबू उभारून राहण्याची सोय केली. त्यानंतर विभागामार्फत आमंत्रित प्रमुख एस.के.डी.चे प्राचार्य एस. एन. पाटील यांनी स्काऊट गाईडचे ध्वजारोहण करून मानवंदना दिली.
यावेळी प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड शिबिराचे जीवनातील महत्त्व व उद्देश्य समजावून सांगितला. यावेळी व्ही.के.डी. चे प्राचार्य एन. के. वाघ, सागर कैलास, बबलू देवरे, विजय देवरे उपस्थित होते. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी नियोजनाप्रमाणे सर्व कामे स्वतः पार पाडली. रात्रीच्या वेळी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी शेकोटी गीत गाऊन भारतीय संस्कृती ऐतिहासिक प्रबोधन, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम शिक्षकांसमवेत पार पाडली. दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक धोडप किल्ल्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याचा इतिहास जाणून घेत तेथील ऐतिहासिक अवशेषांचा अभ्यास करून स्थळाची स्वच्छता केली.
Deola | आ. राहुल आहेर यांच्या हस्ते देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
या तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी विखाऱ्या डोंगरावरील जागृत अशा गोरक्षनाथ मंदिर परिसरात श्रमदान करून त्या ठिकाणाचे अध्यात्मिक पावित्र्य जपून ठेवले. श्रीक्षेत्र विखारा पहाड येथील मंदिराचे पुजारी गणेशपुरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन करून, अध्यात्माचे महत्त्व पटवून सांगितले. प्रसंगी हरिपाठ ही घेण्यात आला. या तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांच्या अंगी स्वावलंबन, श्रमदान, सहकार्याची भावना, राष्ट्रभक्ती, नैतिक, मानसिक सुदृढता, राष्ट्रवाद या मूल्यांचा विकास करणे व वृक्षारोपणातून पर्यावरणाविषयी प्रेम रुजविण्याचा हेतू साध्य करण्यात आला.
या शिबिरासाठी स्काऊट गाईड विभाग प्रमुख निवृत्ती आहेर, सदस्य अजय बच्छाव, सुधीर सोनवणे, केशव सोनवणे, कुणाल शिरसाठ, राजू देवरे, राहुल पाटील, पुनम सावंत, उर्मिला शेवाळे, कांचन टेमगिरे, शिक्षक माणिक शिंदे, अभिजीत रणदिवे, भाग्यश्री जाधव,सविता विश्वभर, दिपाली भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. निसर्गरम्य ठिकाणी पार पडलेल्या या शिबिरास संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम