सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७२५ जी मार्गावरील देवळा तालुक्यातील भावडबारी घाट ते रामेश्वरफाटा या ७ किमी मार्गाचे दुसऱ्या लेनचे काँक्रीटीकरणाचे काम साधारण वर्षभरापासून जमीन अधिग्रहण संभ्रमामुळे रखडले असून यावर तोडगा काढण्यासाठी सोमवार (दि.२३) रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय देवळा येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत शेतकरी, कंपनी व आधिकाऱ्यांमध्ये आढावा बैठक झाली. बैठकीत आमदार डॉ. आहेर यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही व ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी महामार्गात जातील. त्यांना मोबदला नक्की मिळेल.
त्यामुळे मार्गाचे रखडले काँक्रीटीकरणाचे काम सुरू करू द्या व जोपर्यंत शेतकऱ्यांचे अधिग्रहण संदर्भात संभ्रम दूर होत नाही. तोपर्यंत साईड पट्टीचे काम होणार नाही. मात्र संबधित भूधारक शेतकऱ्यांचे म्हणणे जोपर्यंत त्यांच्या गटातील किती जागा भूसंपादन होणार ते निश्चित होत नाही. तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा सूर बैठकीत दिसून आला होता. तसेच रामेश्वरफाटा ते गुंजाळनगर काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश संबधित कंपनीला दिले आहे.
Deola | आ. सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील शाळांना संगणक वाटप
महामार्गावरील भावडे, रामेश्वर व सुभाषनगर येथील २४ गट धारकांची हद्द कायम मोजणी करण्याची कारवाई पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांना ह्या हद्द खुणा अमान्य असून पुढील दोन दिवसांत भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी व संबंधित कंपनी स्वतः प्रत्यक्षात बांधावर जाऊन खुणा निश्चित करणार असल्याचे यावेळी आ. डॉ आहेर यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना मोजणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार होता. परंतु शेतकऱ्यांनी या हद्द खुणा अमान्य केल्यामुळे उर्वरित दुसऱ्या लाईनचे काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे. यावेळी प्रमोद पाटील, सुनील आहेर, देवानंद वाघ, अशोक आहेर, चंद्रकांत आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम