सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील विविध शाळांना नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून संगणक, पोडियमचे वाटप करण्यात आले. संगणक व पोडियमच्या वाटपामुळे शाळेतील कामांना गती मिळणार असून शालेय कामकाज करताना सुलभता निर्माण होऊन ऑनलाईन काम शाळा स्तरावरून करण्यास मदत होणार आहे. देवळा तालुक्यातील तेरा शाळांना नुकतेच आमदार तांबे यांच्या माध्यमातून संगणक व पोडियमचे वाटप करण्यात आले.
Deola | मेशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी योगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड
यात मविप्र समाजाचे जनता विद्यालय देवळा, जिजामाता कन्या विद्यालय देवळा, माध्यमिक आश्रम शाळा शेरी, माध्यमिक आश्रम शाळा रामेश्वर, रुखमोती माध्यमिक विद्यालय मटाने, जनता विद्यालय खडकतळे, जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड, महात्मा फुले विद्यालय माळवाडी, जि. प. शाळा गुंजाळनगर, के.एल.डी. देवरे विद्यालय दहिवड आदि शाळांचा यात समावेश आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत, जितेंद्र आहेर, डॉ.कोमल निकम, जी.टी.पगार, मनिष बोरसे, मयूर आहेर, देवळा तालुकाप्रमुख विजय खुळे, गणेश शेटे, कौतिक खोंडे, सुनील शिंदे, नितीन चव्हाण, सोनजे सर, सागर भाऊसाहेब, प्रदीप राऊत आदि मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह तालुक्यातील आ. डॉ. सुधीर तांबे मित्र मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शाळांना संगणक, पोडियम उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. तांबे यांचे पोपट विश्वास यांनी देवळा तालुक्यातील शाळांच्या वतीने आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम