सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक विभाग तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची सप्तशृंगी गडावर राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली नुतीच बैठक संपन्न झाली. यात नाशिक विभागीय कार्यकारिणीची घोषित करण्यात आली असून, ती पुढील प्रमाणे – नाशिक विभागीय अध्यक्षपदी – योगेश पगार (देवळा), कार्याध्यक्ष- सुरेश सौदागर(अहिल्यानगर), उपाध्यक्ष- राजेंद्र कलंदरकर (अहिल्यानगर), सहकार्याध्यक्ष- घनश्याम सातपुते (नाशिक), तज्ञ कायदेशीर सल्लागार- पंकज पवार(नाशिक), संघटक- अनिल न्हायदे (नाशिक), संपर्कप्रमुख- सुमित गोसावी (धुळे) याप्रमाणे नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करून त्यांना जबाबदारी देण्यात आली. बैठक यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे, जिल्हा सचिव माया मोढे, जिल्हा कोषाध्यक्ष विनोद अहिरे, राज्य उपाध्यक्ष संजय बाविस्कर, नाशिक विभागिय अध्यक्ष योगेश पगार आदींसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संघटनेच्या रविवार (दि.२२) रोजी झालेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथील बैठकीत राज्यातील ग्रा.पं.अधिकारी यांच्या मंत्रालय स्तरावर प्रलंबीत असलेल्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. सदर बैठकीस राज्य सचिव हरिश्चंद्र काळे (अहिल्यानगर), मधुकर मुंगल (नांदेड), महेंद्र निकम (छत्रपती संभाजी नगर), नारायण पवार व स्नेहल नरळे पाटील (सातारा), कुशाबा इंगळे, सुरेश चौधरी, गुलाब वडजे, सुनिल राजपुत, विजय पाटील, रवींद्र ठाकरे, शशिकांत नरोडे, यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Deola | आ. राहुल आहेर यांच्या हस्ते देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
याप्रसंगी विविध प्रश्नावर चर्चा करुन महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. शासनाने (दि.२४) सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी केले या निर्णयामुळे संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर करण्याच्या मार्गातील एक टप्पा सोडविल्याबद्दल राज्य शासन व ग्रामविकास विभागाचे अभिनंदनचा ठराव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास सातव्या वेतन आयोगानुसार दि. १ जानेवारी २०१६ पासून काल्पनिक वेतनवाढ लागू करून वेतन निश्चितीत एकसमानता येण्याकरिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येणे बाबत संघटणेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे ठरले, संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन नवीन पदनामाप्रमाणे संघटनेच्या नावात महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना असा बदल करण्यात आला. तसेच घटना दुरुस्ती करण्यासाठी द्विसदस्य समिती स्थापन करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकारी संवर्गावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करणे, मंत्रालय स्तरावर प्रलंबित अहवालचा पाठपुरावा करून शासन निर्णय निर्गमित करून संवर्गास दिलासा देणे बाबत ठराव घेण्यात आले. संघटना कार्यकारिणीची सन २०२५-२०३० या पंचवार्षिक काळासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करुन निवडणूक ठिकाण सातारा येथे घेण्याचे ठरले.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, सर्व ग्रा.पं.अ. आता या संघटणेचे सभासद होऊ शकतील असे बदल घटनेत करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्षपदी- संजय बाविस्कर (नाशिक) महिला उपाध्यक्ष- आरती पाटील (नंदुरबार), राज्य सहकार्याध्यक्ष- हेमंत पवार (नाशिक), राज्य प्रसिद्धीप्रमुख- आशिष चौधरी (नांदेड), राज्य समन्वयक व कौन्सिलर- अनुप श्रीवास्तव (नांदेड) पुणे विभागीय अध्यक्ष- विजय हुंबे (सातारा) यांची बैठकीत निवड करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम