सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | परभणी येथे एका माथेफिरू व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली असून, सदर घटनेचा देवळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सदर प्रकार करणाऱ्या माथेफिरू व्यक्तीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले. यात भारतीय संविधानाने आज अमृतमोहत्सवी वर्षात पदार्पण केले असून भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकसंघ ठेवून आज भारत देश जगाच्या नकाशावर एक प्रगत राष्ट्र म्हणून नावलौकिक मिळवत आहे.
Deola | बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराचा देवळा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने जाहीर निषेध
परंतु जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या इसमाकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते. ही बाब अत्यंत गंभीर असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच परभणी येथील भीम सैनिकांवर झालेले खोटे नाटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळा जाधव, भारत आहीरे, शरद आहीरे, अनिल जाधव, श्रीकांत केदारे, विकिराज आहिरे, यश निरभवणे, राजेंद्र आहिरें,किरण आहीरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम