सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | बांगलादेश येथे होणा-या हिंदुंच्या अमानुष हत्या, हिंदू मंदिरावरील हल्ले व हिंदु देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना व मोडतोड आणि नासधूस थांबवावी. तसेच निरपराध हिंदु संतांना त्वरित जेलमधून सोडवावे. यासाठी देवळा तालुका सकल हिंदु समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.१०) रोजी निषेध नोंदवत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महंत गणेशजी महाराज, महंत विश्वेश्वर आनंद महाराज, भाजपचे किशोर आहेर, पवन अहिरराव, विजय आहेर, दिनकर आहेर, सोमनाथ शिंदे, सुनील शिंदे, नगरसेवक नानु आहेर, पवन कोठावदे, विश्व हिंदू परीषदेचे नाना गोसावी, संघाचे बापु शिंदे, पुंडलिक आहेर, बंडु शेवाळकर, आदीसह हिंदुत्ववादी संघटना, धर्मगुरू, संत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम