Deola | भावडे येथील व्ही.के.डी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यालयाच्या परंपरेनुसार यंदाच्या महाभारत या विशिष्ट संकल्पनेवर आधारित भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. सायंकाळच्या वेळी मनमोहक वातावरणात रंगीबेरंगी दिव्यांच्या लखलखाटात स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संदीप पाटील (जनरल मॅनेजर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर नाशिक), दीपक पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळा), विजय पागर (संचालक मराठा विद्या प्रसारक समाज), संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, उपाध्यक्ष भूषण पगार, सचिव मीना देवरे, बापू देवरे, प्राचार्य एस.एन.पाटील, एन.के.वाघ, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख शोभा जाधव, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.

Deola | भावडे येथील एस.के.डी स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

व्ही.के.डी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या भव्य व्यासपीठावर चिमुकल्यांनी एकूण ३४ नृत्याविष्कार सादर केले. यात कांतारा चित्रपटातील नृत्य विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या रोमांचक कलाकृतींनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आवडत्या कला सादरीकरणाला प्रेक्षकांमार्फत रोख स्वरूपाचे बक्षीस प्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख क्रांती सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक क्रांती सूर्यवंशी, श्याम रिठे, सीमा अहिरे, हर्षल चव्हाण व विद्यार्थी पूर्वा पवार, सर्वज्ञ शेवाळे, मितेश खैरनार, सलोनी पगार, वेदिका चीमनपुरे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीत विभाग, क्रीडा विभाग, कला विभाग, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास, हेमंत शिंदे, विजू देवरे, राजू देवरे, शुभम मंडप डेकोरेटर्स देवळा यांचे सहकार्य लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here