Deola | देवळा येथील शेतकरी बाळासाहेब देवरे यांचा ‘डिस्ट्रिक्ट मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

0
9
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वाजगाव (ता.देवळा) येथील उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी बाळासाहेब देवरे यांना शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथे कृषी जागरण आणि आयसीएआर या कृषी क्षेत्रातील संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा डिस्ट्रिक्ट मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय कृषी तथा किसान राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी त्यांची निवड आयसीएआर या संस्थेने केली होती. यावेळी कृषी जागरण अँड ऍग्रो कल्चर वर्ल्डचे संस्थापक एम.सी डोमिनीक, मुख्य व्यवस्थापक संजय डोमिनिक सहाय्यक व्यवस्थापक डॉ. राजश्री रॉय उपस्थित होते.

Deola | भावडे येथील एस.के.डी स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

देवरे हे गेल्या काही वर्षांपासून ते शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. कृषी, कृषी संलग्न तसेच फलोत्पादन क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्या शेतात नारळाची सव्वा दोन हजार झाडे लावली आहेत. याशिवाय कमी पाण्यात सीताफळ, आंबा, पेरू, द्राक्षे, डाळिंब अशा अनेक फळझाडांची हजारोंच्या संख्येत लागवड करत आधुनिक फळशेती ते करतात. जिल्ह्यात प्रथमच सफरचंद लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. शेतातील प्रत्येक जागेचा उपयोग तसेच सेंद्रिय शेतीचा आग्रह यामुळे प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भाकड गाईंचे संगोपन करत शेणखत आणि गोमूत्राचा वापर करत त्यांनी आपली फळशेती फुलवली आहे.

Deola | देवळा येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी साजरी

याशिवाय ग्रामीण भागातील शेती, येथील निसर्ग, वेगवेगळ्या पिकांची, फळाफुलांची ओळख शहरातील मुलांना व्हावी. तसेच युवा शेतकऱ्यांना येथील प्रयोगशील शेती कळावी आणि धावपळीच्या जीवनात कुटुंबासमवेत, मित्र-मैत्रिणींबरोबर या निसर्ग सानिध्यात मनमुराद विरंगुळा मिळावा. या उद्देशातून त्यांनी शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही त्यांना यापूर्वी उद्यानपंडित पुरस्कार मिळाला आहे. या साऱ्या बाबींची दखल घेत देवरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बाळासाहेब देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत आपण राबवत असलेल्या शेतीच्या उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here