सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये परंपरेनुसार यंदा रामायणवर आधारित भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. निसर्गरम्य अशा डोंगर पायथ्याशी असलेल्या या स्कुलमध्ये सायंकाळच्या मनमोहक दृष्यात स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, उपाध्यक्ष भूषण देवरे, सचिव मीना देवरे, मोहन वाघ (निवृत्त जॉइंट डायरेक्टर कृषी विभाग), मधुकर कड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी नाशिक), जयवंत बिरारी (व्यवस्थापकीय संचालक हर्ष कन्स्ट्रक्शन), वैशाली वाघ, शितल बिरारी, नलिनी कड , प्राचार्य एस.एन.पाटील , एन.के. वाघ, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.
Deola | एस.के.डी. विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर हनुमान चालीसाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य व्यासपीठावर चिमुकल्यांनी एकूण 27 नृत्याविष्कार सादर केले. यात गायन, नृत्य, एकांकिका यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या रोमांचक कलाकृतींनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले व मोठा प्रतिसाद मिळाला. आवडत्या कला सादरीकरणाला प्रेक्षकांमार्फत रोख स्वरूपाचे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सांस्कृतिक व पूर्व प्राथमिक विभागप्रमुख शोभा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक सुधीर सोनवणे, अजय बच्छाव, शितल निकम, प्रियंका पाटणे, विद्यार्थी रुद्राक्ष सोनवणे, रुचिरा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संमेलन यशस्वीतेसाठी संगीत विभाग, क्रीडा विभाग, कला विभाग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर, कैलास, सागर देवरे, शुभम मंडप डेकोरेटर्स देवळा यांचे सहकार्य लाभले. सुधीर सोनवणे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम