सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कणकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कडू शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन नामदेव शिंदे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला असून, त्यांच्या रिक्त जागी नूतन चेअरमन पदाच्या निवडीसाठी सहायक निबंध सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.६) रोजी सकाळी ११ वाजता संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते चेअरमन पदी कडू शिंदे यांची निवड करण्यात आली.
Deola | भाजप अध्यात्मिक आघाडी सहसंयोजकपदी ह.भ.प संजय नाना धोंडगे यांची नियुक्ती
त्यांना सूचक म्हणून बापू शिंदे यांनी तर अनुमोदन म्हणून मावळे चेअरमन नामदेव शिंदे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी व्हा.चेअरमन देवाजी शिंदे संचालक सर्वश्री श्रीमती निर्मला शिंदे, अनिता शिंदे, बापू शिंदे, दादाजी शिंदे, दिनकर शिंदे, निंबा बर्वे, दशरथ मोहिते, अशोक शिंदे, किशोर सावकार, काळू पवार, सचिव पुंडलिक आहेर आदींसह
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विकास सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते. नूतन चेअरमन कडू शिंदे यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम