Deola | देवळा येथील प्रियंका कोठावदे यांची केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड

0
23
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रियंका भूषण कोठावदे यांची CBFC ( Central Board of Film Certification) केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी भारत सरकार तर्फे तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे .केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळ हि माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेली संस्था असून, हि संस्था सिनेमॅटोग्राफर कायदा १९५२ अंतर्गत जारी केलेल्या तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर नियंत्रण ठेवते. या चित्रपट प्रमाणन मंडळावर ग्रामिण भागातून निवड झालेल्या प्रियंका कोठावदे ह्या एकमेव महिला गायिका ठरल्या आहेत.

देवळा येथील आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. प्रियंका ह्या उत्कृष्ट गायिका असून युट्युबवर त्यांनी आपल्या मधुर आवाजात अनेक गाणी प्रसिध्द केली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या गाण्यांना पसंती दिली आहे. गायिका कोठावदे ह्या युवा व्यावसायिक भूषण कोठावदे यांच्या पत्नी तर देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे, अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भारत कोठावदे यांच्या त्या भावजाई होत. कोठावदे यांची केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, फेडरेशनचे राज्य संचालक केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, डॉ. प्रशांत निकम, राजेंद्र वडनेरे, योगेश वाघमारे आदींसह तालुका व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here