सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | महाराष्ट्र राज्य चौथी 19 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप असोसिएशन द्वारे नाशिक येथे आयोजित क्रिकेट स्पर्धांमध्ये एस. के. डी. चारिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, भावडे येथील एस. के. डी. व व्ही. के. डी. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
Deola | देवळ्यात सुराणा पतसंस्थेच्या वतीने गॅस गळती दुर्घटनेतील वारसाला ११ हजारांची आर्थिक मदत
विजयी संघाची थेट राज्यस्तरावर निवड झाली
यशस्वी संघाकडून विद्यार्थी सुमित बेडसे, कार्तिक पटेल, सार्थक झाडे, कृष्णा देवरे, जयेश भामरे, कृष्णा आवारे, अक्षय आहेर या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत विजय निश्चित केला. विजयी संघाची थेट राज्यस्तरावर निवड झाली. यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, प्राचार्य एस. एन. पाटील, व्ही. के. डी.चे प्राचार्य एन. के. वाघ शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे आदींनी अभिनंदन केले. विजयी संघाला क्रीडाशिक्षक सय्यद मुदसर जमील, यज्ञेश आहेर, धनंजय परदेशी, सुशांत बागुल, भालेराव निलेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम