Vidhansabha Election | राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; उदयकुमार आहेरांवर मोठी जबाबदारी

0
56
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Vidhansabha Election |   राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून  जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील तीनही घटक पक्षांकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्या असून, सभा, दौरे, रॅली यांचा धडाका सुरू आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची आणि स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत देवळ्याचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते उदयकुमार आहेर यांच्या नावाचाही समावेश आहे.

नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, जिल्ह्यात अजित पवार गटाचे 7 आमदार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात अजित पवार गटाची मोठी ताकद असून, जनसन्मान यात्रेची नाशिकमधून सुरुवात, या कालावधीत सर्वाधिक वेळ नाशिक जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा, पहिल्याच यादीत नाशिक जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा यामुळे अजित पवारांचे नाशिककडे विशेष लक्ष असल्याचे दिसून येते. पक्षाकडून सातही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांनी आपापल्या मतदार संघातून सर्वप्रथम अर्ज दाखल केले असून, प्रचारात आघाडी घेतली आहे. यातच आता स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर झाली असून, यात नाशिकमधील छगन भुजबळ आणि उदयकुमार आहेर यांच्याही नावाचा समावेश असल्याने याचा जिल्ह्यात राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही.

Assembly Election | नाशकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू; आज ‘या’ दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

उदयकुमार आहेरांची राजकीय कारकीर्द

देवळा तालुक्यातील एका सामान्य शिक्षकाचा मुलगा ते शिवसंग्राम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते असा आहे उदयकुमार आहेरांचा राजकीय प्रवास. स्व. विनायक मेटे यांच्या निधनानंतर उदयकुमार आहेरांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला केवळ वर्ष झाले असावे. मात्र या वर्षभरातच उदयकुमार आहेरांनी आपल्या कामाच्या जोरावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचा विश्वास संपादन करत पक्षाची दोन महत्त्वाची पदं मिळवली. यातच आता विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Jansanman Yatra | देवळ्यातील जनसन्मान यात्रेतून राष्ट्रवादीच्या नव्या कारकीर्दीचा ‘उदय’

Vidhansabha Election | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची स्टारप्रचारक यादी : 

  1. अजित पवार
  2. प्रफुल्ल पटेल
  3. सुनील तटकरे
  4. छगन भुजबळ
  5. दिलीप वळसे पाटील
  6. धनंजय मुंडे
  7. हसन मुश्रीफ
  8. नरहरी झिरवळ
  9. आदिती तटकरे
  10. नितीन पाटील
  11. सयाजीराव शिंदे
  12. अमोल मिटकरी
  13. जल्लाउद्दीन सैय्यद
  14. धिरज शर्मा
  15. रूपाली चाकणकर
  16. इद्रिस नायकवडी
  17. सुरज चव्हाण
  18. कल्याण आखाडे
  19. सुनील मगरे
  20. महेश शिंदे
  21. राजलक्ष्मी भोसले
  22. सुरेखाताई ठाकरे
  23. उदयकुमार आहेर
  24. शशिकांत तरंगे
  25. वासिम बुन्हाण
  26. प्रशांत कदम
  27. संध्या सोनवणे

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here