Nashik | दीपक बडगुजरच्या जामिन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार; आज निर्णय होण्याची शक्यता

0
38
#image_title

Nashik | सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर यांच्यावर असलेल्या आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्या खुनाच्या आरोपप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर काल गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी युक्तीवाद पार पडला असून या अर्जावर शुक्रवार दि. ११ रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

नेमके प्रकरण काय? 

2022 मध्ये झालेल्या उपेंद्रनगर गोळीबार प्रकरणाचा गुंड विरोधी पथकाने तपास करीत आकाश आनंद सुरत, श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या सनी पगारे, मयूर बेट यांना पकडले होते. त्यानंतर सखोल चौकशीत दीपक बडगुजरचा निकटवर्तीय अंकुश शेवाळे व प्रसाद शिंदे या दोघांची नावे उघड झाल्याने त्यांना पोलिसांनी पकडले.

Nashik Politics | नाशकात मिसळ पार्ट्यांचे बेत वाढले; युतीसह आघाडीतही उमेदवारीसाठी चढाओढ

फरार बडगुजरंकडून जामिनासाठी अर्ज

यादरम्यान, जाधव यांच्या खुनाची सुपारी बडगुजर यांनी दिल्याचे पुरावे समोर आल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. मात्र अटक होणार असल्याची खबर लागताच बडगुजर फरार झाले. त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून गुरुवारी अंतिम सुनावणी झाली आहे. तर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने त्यानुसार अटकपूर्व जामीनावर निर्णय राखून ठेवला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here