Deola | निंबोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी एकलव्य भिल्ल सेनेचे बापू तलवारे यांची नियुक्ती

0
31
Deola
Deola

Deola | निंबोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी एकलव्य भिल्ल सेनेचे शाखा अध्यक्ष बापू रामदास तलवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच श्रीमती भारती सावंत यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला आहे. नवीन उपसरपंच निवडीसाठी लोकनियुक्त सरपंच प्रदीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि. ५ रोजी ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते बापू तलवारे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

Dindori | भास्कर भगरे यांना एकलव्य भिल्ल सेनेचा पाठिंबा – रघु नवरे

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रदीप निकम, विनोद गरुड, गोरख देवरे, संजय निकम, राजेंद्र अहिरे, श्रीमती छायाताई देवरे, श्रीमती सुशाबाई तलवारे, श्रीमती सुनिता निकम, श्रीमती बिबाबाई निकम आदींसह माजी सरपंच अरुण सावंत, विठ्ठल देवरे, भाऊसाहेब निकम, नितीन निकम, ग्रामसेवक अमोल खैरनार उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच तलवारे यांचे वायबीएस ग्रुपचे तालुकाध्यक्ष रघु नवरे, सुनील गांगुर्डे, प्रल्हाद नवरे, पोपट जाधव, रतन जाधव, आप्पा पवार, गोरख तलवारे, साहेबराव निकम, बाबाजी निकम, सचिन देवरे, साहेबराव निकम, बाबाजी निकम, सतीश सावंत, बबलू सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, ताराचंद निकम आदींनी अभिनंदन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here