वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रणेते पद्म विभूषण पांडुरंगशास्त्रीजी आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. सध्या स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत.
जन्माष्टमीनिमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली २२ वर्षे निरंतर सुरू आहे. आज दुर्दैवाने जन्माष्टमी फक्त दहीहंडीची उंची, थर आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे ज इतक्यावरच सीमित झाली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचे विचार जन्माष्टमी उत्सवात कुठे दिसतच नाहीत. अशा विपरीत काळात स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमीनिमित्त प्रतिवर्षी सादर होणारी ही पथनाट्ये समाजात काहीतरी सकारात्मक आणि रचनात्मक करण्याचा प्रयास करतात.
Youth Day | स्वाध्याय परिवाराचा आज ‘युवा दिन’
युनिव्हर्सल फॉरमॅट…
यंदा देशभरातील विविध राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश यांसारख्या विविध देशांतही, विविध राज्यात, विविध भाषामध्ये एका वेळेला ‘मेरे संग संग’ या पथनाट्यातूनच स्वाध्याय परिवाराच्या युवकांच्या टीम्स समाजाला दैवीविचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये १७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून ती पथनाट्ये २६ ऑगस्ट पर्यंत सादर केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ‘लेना – देना बंद हैं, फिर भी आनंद हैं ‘ या उक्ती प्रमाणे कोणत्याही प्रलोभनाशिवाय, अत्यंत निरपेक्षपणे हे युवक पथनाट्य सादर करतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम