Deola | देवळा तालुक्यात दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा घात

0
134
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्याने एकाकडून दुसऱ्याचा खून झाल्याची घटना मटाणे (ता.देवळा) येथे बुधवार (दि.३१) रोजी घडली. यामुळे देवळा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मयताच्या संतप्त नातेवाईकांनी आंदोलन याबाबत देवळा पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

Deola | नेमकं काय घडलं..?

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मटाने येथे कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक निंबा साबळे (वय ४५) व तेथील रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या (वय ३८) यांनी सकाळी सोबतच देवळा येथे मद्यपान केले. त्यात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर ते मटाने येथे निघून गेले व दुपारी चार वाजेच्या दरम्यान मटाने-कळवण रस्त्यावरील चिकन दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की संतोष पवार याने दीपक साबळे याच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Deola | देवळ्यातील अजब चोरीची चर्चा; रात्री चोरी अन् पहाटे चोराने आधारकार्ड, पासबुक परत केले

याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवार याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मयत साबळे याला देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच मयतांच्या नातेवाईकांनी देवळा पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी व यामागचे सुत्रदार व साथीदार यांच्यावर कारवाई व्हावी.

यासाठी देवळा पाच कंदीलवरती काही काळ रस्त्यावर बसून आंदोलन केले. पोलिसांनी त्यांची समजूत काढून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला व नातेवाईकांकडून रीतसर फिर्याद नोंदवण्यास सांगितले. परंतु घटना घडून चार ते पाच तासांहून अधिक काळ लोटला. तरी नातेवाईकांकडून रीतसर फिर्याद नोंदवली गेली नसल्याने पाच कंदील परिसरात तणावाचे वातावरण होते.

Deola Crime | देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here