सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथे देवळा बाजार समितीच्या आवारात देवळा भूमी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने भाजीपाला लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे माजी सभापती व नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी टोमॅटो, मेथी, मिरची, वाल आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळाल्याने तसेच रोख पेमेंट देखील मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Deola | ३३/११ के.व्ही. देवळा उपकेंद्राला ISO 9001:2015 नामांकन
या शुभारंभा प्रसंगी सभापती योगेश आहेर, देवळा भूमी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन किशोर चव्हाण, संचालक दिलीप पाटील, भाऊसाहेब पगार, माजी सभापती बापू देवरे, शंकर निकम, पुंडलिक आहेर, अनिल आहेर, सचिव माणिक निकम आदींसह शेतकरी उपस्थित होते. देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाल, टोमॅटो आदींची लागवड करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपला माल देवळा बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम