सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक दशनाम गोसावी व कसमादे दशनाम गोसावी समाज यांच्या सयुंक्त विद्यमाने देवळा येथे रविवारी (दि.२१) रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्यास कसमादे तालुक्यातील दशनाम गोसावी समाजातील विद्यार्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी १७५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता १०वी व 12वीत प्रथम आलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तसेच समाजातील जेष्ठ नागरीकांना जीवनगौरव, समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना समाजरत्न, समाजभुषण, उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
Deola | ‘सुपर फिफ्टी’ परीक्षेचा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह; देवळ्यात २१४ विद्यार्थ्यांचा सहभाग
तसेच प्रशासकिय कामात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कारीत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन गटनेते संभाजी आहेर, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, अनुप गोसावी, अण्णागिरी गोसावी, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, विशाल गोसावी, दर्याव महंत कैलास गोसावी, संजय गोसावी, वसंत गोसावी, धर्माअण्णा गोसावी, सतिष भारती, भास्कर भारती, बाळासाहेब गिरी, शरद गोसावी, कारभारी भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
Deola | वसाका वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; बुधवारी लाक्षणिक उपोषणाचा एल्गार
विद्यार्थी गुणगौरव झाल्यानंतर आलेल्या सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान गोसावी, दादाजी गोसावी, नारायण गोसावी, अशोक गोसावी, श्रीराम गोसावी, दिपक गोसावी, राजेंद्र गोसावी, राजेंद्र गोसावी , रविंद्र गोसावी , अनिल गोसावी , वाल्मीक गोसावी ,. सुदाम भारती, राजेंद्र भारती ,.हरी भारती , बापु भारती, दिनेश भारती, राजेंद्र भारती, ज्ञानेश्वर गोसावी, भाऊसाहेब गोसावी, भारत गोसावी, मिननाथ भारती, गोरख गोसावी, शोभा गोसावी, रंजना गोसावी यांनी अथक परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम